पुणे : विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महापालिकेच्या शाळेतील शिक्षक गजाआड

पुणे महापालिकेच्या शाळेत शारीरिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी खडक पोलिसांकडून कंत्राटी पद्धतीवर नेमणूक केलेल्या शिक्षकाला अटक करण्यात आली.

मोहंमद कय्युम अन्सारी ( रा. कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महापालिकेच्या एका शाळेत कंत्राटी पद्धतीने अन्सारीची भरती करण्यात आली होती. तो शाळेत शारीरिक शिक्षणाचे (पीटी) प्रशिक्षण देत होता. त्याने शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. ‘कोणाकडे तक्रार करायची असेल तर करा, मी कोणाला घाबरत नाही’, अशी धमकी त्याने विद्यार्थिनींना दिली होती.

याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) तसेच विनयभंग केल्या प्रकरणी अन्सारीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply