पुणे : वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया,

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे  यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली आहे. यानंतर पुण्यासह राज्यातील मनसेमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहण्यास मिळत आहे. मोरे यांच्यावरील कारवाईनंतर मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या सर्वावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या की, वसंत मोरे हे जन सामान्यांमध्ये सहभागी होऊन प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी असून, मी स्वतःदेखील त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. मात्र, ज्या प्रकारे मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यातआले आहे ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच अंतर्गत राजकारणातून ही खेळी खेळली गेल्याचा आरोपही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. मी देखील अशाच राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडले, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या. वसंत मोरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या काळजीतून भोंग्यांबाबतच्या भूमिकेला विरोध केल्याचे सांगितले



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *