पुणे: लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. अखेर या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पुण्याच्या हडपसर परिसरातील हांडेवारी येथे सोमवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वानेवाडी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिव्या तरुण कानडे (वय २४, रा. नवरत्न एक्झोटिका सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.
वानेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घानेगाव (ता. गंगापूर जि औरंगाबाद) येथील दिव्या शामराव बनसोडे या उच्चशिक्षित तरुणीचा तरुण कानडे (वय ३०) याच्यासोबत १ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतरच दिव्याला सासरच्या मंडळींनी त्रास देणं सुरू केलं. लग्नात मानपान तसेच हुंडा कमी दिला म्हणून तिच्या सासरची मंडळी दिव्याला सतत टोचून बोलत मानसिक त्रास द्यायचे.
"तुझा बाप श्रीमंत आहे. त्याच्याकडे भरपुर पैसा आहे. त्यांनी लग्नातसुद्धा मानपान केला नाही, हुंडा देखील कमी दिला" असे बोलून सासरची मंडळी दिव्याचा छळ करत होते. इतकंच नाही तर, त्यांनी वेळोवेळी संगनमत करुन दिव्याला पैशांची तसेच दागिण्यांची मागणी देखील केली. अखेर सासरच्या छळाला कंटाळून दिव्याने सोमवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास राहत असलेल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
याप्रकरणी शामराव आनंदा बनसोडे (वय 50, रा. घानेगाव,गंगापूर, औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वानेवाडी पोलिसांनी दिव्याचा पती तरुण कानडे (वय 30), सासरे मदन कानडे, सासू सपना कानडे, दीर अरुण यांच्याविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिव्या गर्भवती असूनही तिचा छळ केला जात होता, असे बनसोडे यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
