
पुणे : कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे राज्यात सध्या पुन्हा हलका गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत पुन्हा काही प्रमाणात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढला होता. सर्वत्र किमान तापमान सारसरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घटले होते. मात्र, बंगालच्या उपसागरात आणि पाठोपाठ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने केरळ, तमिळनाडूसह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली. राज्यात प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमान सरासरीपुढे जाऊन थंडी गायब झाली होती. रात्री उकाडा जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती असल्याने किमान तापमानात काही प्रमाणात घट होऊन हलका गारवा निर्माण झाला आहे.
गुरुवारी (१ डिसेंबर) औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात इतर भागांतही तापमान सरासरीखाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आदी भागांत हलका गारवा आहे. मुंबईसह कोकण विभागात तापमान सरासरीच्या जवळ आहे. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली असल्याने रात्री या भागातही हलका गारवा आहे. दोन ते तीन दिवसांत मात्र पुुन्हा प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात २ ते ३ अंशांनी तापमानवाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई परिसरात देशातील उच्चांकी तापमान
राज्याच्या बहुतांश भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली किंवा जवळ आल्याने हलका गारवा आहे. मात्र, निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे बहुतांश भागात दिवसा उन्हाचा चटकाही जाणवत आहे. मुंबईतील सांताक्रुझ केंद्रावर बुधवारी (३० नोव्हेंबर) ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या दिवशी हे तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले. गुरुवारी मात्र त्यात सुमारे २ अंशांनी घट झाली. गुरुवारी रत्नागिरी येथे ३५.० अंश सेल्सिअस राज्यातील उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




