पुणे : रसायनाने भरलेल्या उभ्या ट्रकला मागून दुसऱ्या ट्रक ची धडक

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर (ता.हवेली) येथे शुक्रवारी सकाळी रसायनांचे भरलेले कॅन घेऊन उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. यानिमिताने पुणे सातारा रस्त्यावरील चहाच्या टपऱ्या आणि त्याठिकाणी थांबणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत राजगड पोलिस आणि प्रत्यक्षदर्शी नागरीक यांनी माहिती दिली. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापुर येथील पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. रसायनांचे कॅन भरलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात पाठीमागच्या ट्रकची डावी बाजू पूर्ण चक्काचूर झाली. या अपघातात पाठीमागील ट्रक मधील एक जण किरकोळ जखमी झाला.

तर धडक बसल्याने रसायनांच्या कॅनमधून धूर निघू लागला. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अग्निबंबाने रसायनांच्या ट्रकवर पाण्याची फवारणी केली. त्यामुळे आगीचा धोका टळला.

मात्र यानिमिताने पुणे-सातारा रस्त्यावर चहाच्या टपऱ्या आणि त्याठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यापूर्वीच याठिकाणी मोठा अपघात झाला होता. तरीही अद्याप रस्त्याच्या कडेला चहाच्या टपऱ्या जोरात सुरू असून त्याठिकाणी थांबणारी वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहतात. याठिकाणी अपघाताचा धोका असतानाही महामार्ग आणि राजगड पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply