पुणे : मोदींच्या सुरक्षेसाठी २००० पोलीस! देहूला छावणीचं स्वरुप; १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर जबाबदारी

पुणे : देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्या ने देहू परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३०० पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे काही तासांमध्ये देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षसाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. २ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. 

ज्या नागरिकांना सभास्थळी जायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. सकाळी ८ वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत केवळ व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना प्रवेश नाही. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे.

नागरिकांच्या वाहनांची बायपासला सोय करण्यात आली आहे. खंडेलवाल चौकापासून परंडवाल चौकापर्यंत येण्यासाठी २० बस आहेत. तेथून चालत सभास्थळी यायचं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

गाडीची रिमोट चावी, पर्स, बॅग, पाणी बॉटल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आत नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे सभास्थळी जाणाऱ्या नागरिकांनी या वस्तू सोबत न आणता गाडीमध्येच ठेवाव्यात, असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply