पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमणकडून सरसकट कारवाई व्हावी- मिनाज मेमन

उंड्री: महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून आठवड्यातून फक्त दोन दिवस ठराविक रस्त्यावर कारवाई केली जाते. सरसकट कारवाई करून वाहतुकीसाठी विनाअडथळा रस्ता खुला करावा, अशी मागणी निवेदन हडपसर विधानसभा रिपाइंच्या महिला अध्यक्षा मिनाज मेमन यांनी निवेदनाद्वारे पालिकेच्या बांधकाम विभागातील शहर अभियंत्यांकडे केली आहे.

मेमन म्हणाल्या की, पालिकेच्या बांधकाम व अतिक्रमण विभागाकडून मुख्य रस्त्याच्या साईड मार्जिनवरच केली जाते. तशाच पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पुणे-सोलापूर, मुंढवा-मगरपट्टा, महंमदवाडी-उंड्री, सय्यदनगर-हांडेवाडी, कडनगर-उंड्री चौक, एनआयबीएम, ज्योती चौक, भेकराईनगर, फुरसुंगी, मुंढवा-केशवनगर मांजरी रस्ता या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे. काही ठिकाणी कारवाई केली जाते, तर इतरांना अभय का दिले जाते, असा सवालही त्यांनी निवेदनामध्ये उपस्थित केला आहे.

दरम्यान हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, महापालिकेच्या झोन-४मध्ये येणाऱ्या अतिक्रमण, बांधकाम, आकाशचिन्ह यांची संयुक्त कारवाई आठवड्यातून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतील कार्यक्षेत्रात दोन दिवस केली जाते. अतिक्रमण कारवाईसाठी सर्व झोन कार्यालयांत असणारा अधिकारी-कर्मचारी एकत्रित काम करत असतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply