पुणे : भिमाशंकरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला आग; आगीत बस जळुन खाक

पुणे - नाशिकमध्ये बसला आग लागल्याची घटना ताजी असताना भिमाशंकर येथे देखील प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. श्री क्षेत्र भिमाशंकरला भाविकांच्या बसला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना घडली आहे. कल्याण वरुन २९ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक आग लागली.

या आगीने काहीच वेळात रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि घोडेगाव पोलीसांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र बस आगीत जळुन खाक झाली आहे. बसला जेव्हा आग लागली तेव्हा बसमध्ये २९ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसनेपेट घेतला होता. यामध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *