
पुणे : पुणे शहरात हडपसर येथे झालेल्या बेकायदा दस्त नोंदणीचे लोण राज्यभर गेले आहे. या प्रकरणी पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली. आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत तुकडेबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाचे खोटे ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे दहा हजार ६३५ मालमत्तांची बेकायदा दस्त नोंदणी केल्याची बाब अंशत: खरी आहे. पुण्यात तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करण्यात आल्याचे तपासणीनंतर निदर्शनास आले. त्यानंतर पुणे शहरातील सर्व २७ दस्त नोंदणी कार्यालयांत नोंदविण्यात आलेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाचे गठन राज्य शासनाकडून करण्यात आले होते. या तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यातील तरतुदींचे पालन न करता दहा हजार ५६१ दस्तांची नोंदणी झाल्याचे उघडकीस आले.’
पुण्यासह ठाणे, नाशिक (सिन्नर, बागलाण, निफाड), औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी अशा सात जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची बेकायदा दस्त नोंदणी, गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.
निलंबन, बदली, चौकशी, समज
पुणे शहरातील सर्व २७ दस्त नोंदणी कार्यालयांच्या तपासणीत बेकायदा दस्त नोंदणी केलेल्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबन, बदली, विभागीय चौकशी, समज अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


