पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून पडून मजुराचा मृत्यू; हडपसर भागातील दुर्घटना

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारासह दोघांच्या विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रय बाजीराव उमाप (वय ३५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत उमापची पत्नी रेखा उमाप (वय ३०) हिने हडपरसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दत्तात्रय उमाप दुसऱ्या मजल्यावर काम करत होता. त्या वेळी तोल जाऊन पडल्याने उमाप गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या उमापचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उमापला सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणी बांधकाम ठेकेदारासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *