पुणे : पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार गजाआड; पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कारवाई

पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सिंहगड रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. सागर जानू ढेबे (२३, रा. वेल्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

ढेबे हा सराईत गुन्हेगार असून त्याने पिस्तूल बाळगले होते. सिंहगड रस्ता परिसरातील दळवीवाडी येथे तो थांबल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आबा उत्तेकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच ढेबे पळाला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी आणि पथकाने ही कारवाई केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *