पुणे : करोना आटोक्यात आल्याने पर्यटनस्थळे निर्बंधमुक्त झाली असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) निवासस्थाने पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालयांना १ मेपासून उन्हाळी सुटय़ा लागणार आहेत. सुटय़ांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे नियोजन सुरू केले असून महामंडळाकडून उन्हाळी सुटीनिमित्त खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध शिबिरे, प्रोत्साहनपर पारंपरिक खेळ, योग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिवाळी, नाताळनंतर उन्हाळी सुटीतही पुणे महामंडळाची निवासस्थाने ९५ टक्के आरक्षित झाली आहेत.
याबाबत बोलताना महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, ‘या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडित व्यावसायिकांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. योग आणि वेलनेसची शिबिरे घेण्यात येणार असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यांसारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. करोनानंतर दिवाळी, डिसेंबर आणि आता उन्हाळी सुटीतही महामंडळाच्या पुणे विभागातील निवासस्थानांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. करोनानंतर प्रथमच ही स्थिती दिसून येत असून सध्या १० जूनपर्यंत महामंडळाची ९५ टक्के निवासस्थाने आरक्षित झाली आहेत.’.
सुविधा जाहीर
ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांसह आजी – माजी सैनिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांसाठी खास सवलत, समूहाने २० खोल्यांपेक्षा जास्त खोल्यांचे आरक्षण केल्यास, शालेय सहलींसाठी खास सवलती, विनामूल्य न्याहरी, प्री-वेडींग-रिसेप्शन फोटोशूट, बैठकांसाठी सभागृह, वर्क फ्रॉम नेचर, वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वन्यजीव, खेळ, आसपासच्या निसर्गाची, खाद्यपदार्थाची व्हॉट्सअॅप समूहासह सामाजिक माध्यमांतून माहिती देण्यात येत आहे.
या ठिकाणांना पर्यटकांची पसंती
कडक उन्हाळय़ामध्ये पर्यटक जल पर्यटनासाठी गर्दी करीत आहेत. पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. महामंडळाकडून पर्यटकांना निखळ पर्यटन, निसर्ग आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी http://www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


