पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू दौऱ्यावर; पोलीस पथकाकडून सुरक्षा पहाणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी देहूत दाखल होत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिळा मंदिर आणि मुख्य मंदिर परिसराची पोलीस महासंचालक रजनीश् सेठ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, मंचक इप्पर यांनी पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी आचार्य तुषार भोसले आणि देहू संस्थानाचे विश्वस्थ मंडळींनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. मोंदीनीही त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला होता. त्यानंतर मोदी १४ जूनला देहूत येणार असल्याची माहिती भोसले यांनी ट्विटरद्वारे दिली होती.

येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply