पुणे : नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन

पुणे : रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विमानाप्रमाणेच आता प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर देखील १ तास आधी पोहचावे असे सांगण्यात येत आहे. प्रवाशांनी नियोजित ट्रेन सुटण्याचा आधी रेल्वे स्टेशनवर १ तास पोहचा असा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून नागरिकांना देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन मध्ये चेन ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. याबरोबरच पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा विळखा असल्यामुळे, नागरिकांना स्टेशनवर पोहचायला उशीर होत असल्याने काही नागरिक जाणून बुजून ट्रेन सुरु झाली की चेन ओढतात. या गोष्टीचे गांभीर्य व्यवस्थापनाकडून घेण्यात आले असून, नागरिकांनी स्टेशनवर १ तास यावे. जेणेकरून हे प्रकार कमी होतील, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.

विशेषतः पुण्यातून सायंकाळी बाहेर गावी जाणाऱ्या ट्रेनची संख्या मोठी आहे. गोरखपुर, इंदोर, कोलकाता, जम्मू यासारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून संध्याकाळी प्रस्थान करतात. पुणे शहरात गेल्या दिवसांपासून संध्याकाळी वाहतूक कोंडी देखील होत आहे यामुळे काही प्रवासी यांची ट्रेन निघून जाते या पार्श्वभूमिवर हे अवाहन करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply