पुणे: नियोजित गृहप्रकल्पातील पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू; कात्रज भागातील घटना

पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील टाकीत पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंशिका सुनील सहानी (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. अंशिकाचे वडील सुनील (वय २७) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे आणि ठेकेदार शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात चोरगे यांच्याकडून नियोजित गृहप्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. सुनील सहानी बांधकाम मजूर असून ते गृहप्रकल्पाच्या परिसरात कुटुंबीयांसह राहायला आहेत.

अंशिका पाण्याच्या टाकीजवळ खेळत होती. त्या वेळी अंशिका तोल जाऊन टाकीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. टाकीला झाकण नसल्याचे लक्षात आले. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *