पुणे: तोल गेल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू; ठेकेदारासह बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा

पुणे: नियोजित गृहप्रकल्पात काम करणाऱ्या बांधकाम मजुराचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मरिअप्पा मल्लय्या वनकेरी (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदार मुकुंद हनुमंतराव रेड्डी तसेच बांधकाम व्यावसायिक राहुल नावंदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांघकाम मजूर साहेबराव मल्लया रामोशी (वय ४८, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा परिसरातील टिळेकरनगर परिसरात द्वारिकाधाम सोसायटीत गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या वेळी तोल जाऊन वनकेरी इमारतीच्या चरात (डक्ट) पडला. गंभीर जखमी झालेल्या वनकेरीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने त्याच्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारासह बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply