
पुणे: शहरात सोमवारी रात्री धुमाकूळ घातलेला पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. शहराच्या आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगामुळे हा पाऊस झाला असून, त्याने शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडवला. पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आणखी एक ते दोन दिवस पावसाची हजेरी असणार आहे.
पुणे शहर आणि परिसरामध्ये यंदाच्या चार महिन्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. परतीचा पाऊस राज्याच्या विविध भागात धुमाकूळ घालतो आहे. पुणे शहर आणि परिसरामध्येही मोठा पाऊस होतो आहे. सोमवारी रात्री मात्र शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास शहराच्या आकाशात अकरा किलोमीटर उंचीचे प्रचंड मोठे ढग निर्माण झाले. दिवसभर ऊन असल्याने निर्माण झालेली स्थानिक वातावरणीय स्थिती आणि समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प यामुळे मोठे ढग निर्माण झाले. ढगफुटीसाठी अशाच प्रकारचे ढग कारणीभूत ठरतात. पावणेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. काही वेळातच शहरातील रस्ते पाण्याखाली गेले, घरे सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आणि अनेक नागरिक रात्री रस्त्यावर विविध ठिकाणी अडकून पडले. काही ठिकाणी झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या संपूर्ण शहरात रात्रभर पावसाने हाहाकार उडवून दिला. पहाटेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.
पुण्यात सोमवारी सुमारे दोन ते तीन तासांत अनेक भागात १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. यापूर्वी २०२० मध्ये या केंद्रावर ऑक्टोबरमध्ये एका दिवसात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यापूर्वी २०११ मध्येही १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला होता. पुण्यात मध्यवर्ती भागात २०१० मध्ये ऑक्टोबरमधील आजवरचा सर्वात मोठा पाऊस १८१ मिलिमीटर इतका झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरात एक ऑक्टोबरपासून गेल्या १८ दिवसांत २६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे १ जूनपासून शहरात झालेला पाऊस १००० मिलिमीटरच्या पुढे गेला आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहराच्या पूर्व भागातील पाऊस सर्वाधिक होता. यामध्ये वडगावशेरी भागात १३२ मिलिमीटर, तर मगरपट्टा भागात ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाणमध्ये ९४ मिलिमीटर, कोरेगाव पार्क भागात ९२ मिलिमीटर, लोहगावमध्ये ५४ मिलिमीटर आणि चिंचवडमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्येही पावसाचे प्रमाण मोठे होते. पुरंदरमध्ये १३० मिलिमीटर, तर बारामतीमध्ये १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पमुळे सध्या पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास आणखी काही विलंबाने होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




