पुणे : घोरपडे पेठेत दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या टोळीवर मोक्काची कारवाई

पुणे : घोरपडे पेठेत दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

या प्रकरणी टोळी प्रमुख श्रीनाथ उर्फ टिक्या अशोक शेलार (वय २२, झगडे आळी, घोरपडे पेठ), कुणाल सुरेश जाधव (वय २२), गणेश बल्लाप्पा कोळी (वय २१, दोघे रा. घोरपडे पेठ) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. श्रीनाथ शेलार टोळीप्रमुख असून त्याने साथीदारांशी संगनमत करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, खुनाचा कट रचणे, अपहरण, मुलींची छेड काढणे, दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे शेलार आणि साथीदारांच्या विरोधात दाखल झाले होते. शेलार आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तयार केला होता.

परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी शेलार टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त सतीश गोवेकर तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply