पुणे : खडकवासला धरणातून आज रात्री १२ वाजता ८५६ क्युसेक पाणी सोडले जाणार ; नदी कठाच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे प्रतिनिधी  : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज रात्री १२ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे.यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर,वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. यामुळे पुणेकर नागरिकांची पाणी संकटातून सुटका झाल्याचे म्हणावे लागेल. तसेच या चार ही धरणात जोरदार पाऊस सुरू असून आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९.४७ टीएमसी,३२.४८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. या जोरदार पावसामुळे रात्री १२ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

पुण्यात दिवसभरात १६ ठिकाणी झाडपडीच्या घटना

शनिवारवाडा कॉर्नर, नर्हे स्मशानभूमी जवळ, कोरेगांव पार्क, लेन नं २,कोरेगांव पार्क, लेन नं ४,बिबवेवाडी, भगली हॉस्पिटल,रास्ता पेठ, भाजी मंडई, बावधान, हॉटेल रानवारा,एरंडवणा, राजा मंत्री पार्क, रविवार पेठ, काची आळी,सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिर, कर्वे रोड, नळस्टॉप चौक,खराडी, श्री हॉस्पिटल जवळ, हडपसर, ससाणे नगर, कर्वेनगर, महिमन सोसायटी, सहकारनगर, तळजाई सर्कल आणि सोमवार पेठ, दारुवाला पुल,या १६ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply