पुणे – कोरोना रुग्णांचे वाचविले सात कोटी

पुणे - कोरोनाकाळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले. तर उपचारानंतर घरी सोडल्यावर अनेकांनी महापालिकेकडे बिलांबाबत तक्रार केली, त्यातून एक कोटी १४ हजार रुपयांचे बिल कमी केले. दोन वर्षानंतर कोरोनाची साथ कमी झालेली असताना याच कालावधीत महापालिकेने पुणेकरांचे सात कोटी रुपयांची बचत केली.

कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये पुण्यात सापडला, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. रुग्णांच्या विलगीकरणासाठी महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू केले; तसेच महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारांची सुविधा उपलब्ध केली. शिवाजीनगर व बाणेर येथे जम्बो कोविड रुग्णालय उभे केले. खासगी रुग्णालयांतही उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी होती.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी लागत होती. हे कारण पुढे करून खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिल घेण्यास सुरवात केली. याविरोधात तक्रारी आल्यानंतर रुग्णालयांनी बिल नियमानुसार घेतले आहे की नाही?, याची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आॅडिटरची नियुक्ती केली. उपचारानंतर रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी बिलाची तपासणी केली जात होती. त्यामध्ये जास्त बिल घेतल्याचे लक्षात येताच, लगेच तेथे बिल कमी करून दिले जात असल्याने रुग्णासह नातेवाइकांना आर्थिक दिलासा मिळत होता. अशाप्रकारे सुमारे एक हजार नागरिकांचे सहा कोटी रुपये वाचविण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply