पुणे : कोंढव्यात वाड्याची भिंत घरांवर कोसळली; ११ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

पुणे : कोंढवा बुद्रुक गावठाणात एका वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी शेजारील घरांवर कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून तीन घरांमधील ११ जणांची सुटका केली. 

कोंढवा बुद्रुक गावठाणामधील दत्त मंदिरासमोर एक वाडा आहे. वाड्याशेजारीच नागरिकांची घरे आहेत. जोरदार पावसामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमारास संबंधित वाड्याची भिंत बाजूच्या तीन घरावर पडली. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यांनतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगड, माती व चिखल बाजूला काढून आतमध्ये अडकलेल्या ६ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.

"जुना वाडा अतिशय जीर्ण आहे आणि सर्व रहिवासी आता बाहेर पडले आहेत. या वाड्याची भिंत शेजारी असलेल्या तीन लहान घरांवर पडली,” असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी पाच जणांना वाचवले होते. अग्निशमन दलाने सहा जणांची सुटका केली, असे एकुण ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान मागील आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुढचे 48 तास राज्यासाठी अतिमहत्वाचे आहे. कारण पुढच्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply