पुणे : कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, तीन परदेशी महिला ताब्यात

पुणे : कोंढवा भागातील लुल्लानगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी तीन परदेशी महिलांसह चौघींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली असून, साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लुल्लानगर परिसरातील लाना स्पर्श स्पा सेंटरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक लालरामन लातफळा (वय २१, रा. लुल्लानगर, कोंढवा), संदीप मोकाशी (रा. कोंढवा), अमोल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अण्णा माने यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply