पुणे : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; वानवडी पोलिसांकडून सराईतास अटक

पुणे : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण करुन विवाहासाठी धमकी देणाऱ्या सराईताला वानवडी पोलिसांनी अटक केली. हडपसर भागात ही घटना घडली. या प्रकरणी कृष्णा राजू देवकुळे (वय १८, रा. अंध शाळेसमोर, रामटेकडी, हडपसर) याला अटक करण्यात आली. याबाबत एका अल्पवयीन मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीवर देवकुळे एकतर्फी प्रेम करत आहे. तो तिचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. महिन्याभरापूर्वी मुलीला शाळेजवळ अडवून माझ्याशी लग्न केले नाही तर आई-वडिलांना मारुन टाकीन. माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकी त्याने दिली होती.

त्यानंतर मुलगी घरात एकटी असताना देवकुळेने घरात शिरून, तिला धमकावून घरातून बाहेर नेले आणि स्वत:च्या घरात डांबून ठेवले. माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबीयांना मारुन टाकू, अशी धमकी त्याने तिला दिली. घाबरलेल्या मुलीने आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देवकुळेला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply