पुणेकरांची परदेशवारी होतेय ‘खर्चीक’

पुणे - पुणे (लोहगाव) विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे वाढली असली तरीही अद्याप कोविडपूर्वी जी आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International Flights) होत होती ती बंदच (Close) आहेत. दुबई (Dubai) वगळता सिंगापूर (Singapore) आणि फ्रॅंकफर्टसाठी विमान (Plane) नसल्याने पुणेकरांना (Pune) मुंबई, दिल्ली, बंगळूर ही शहरे गाठावी लागत आहेत. यात मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे. शिवाय पाच ते सात हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा पडत आहे. अशा प्रवाशांची संख्या सुमारे दीड ते दोन हजार आहे. त्यामुळे पुण्याहून थेट फ्लाइट सुरू झाल्यास त्यांचा हा फेरा वाचेल.

पुणे विमानतळावरून आता रोज देशांतर्गत सरासरी ८० विमानांचे उड्डाण होत आहे. यातून ३० ते ३५ हजार प्रवाशांची वाहतूक होते. कोविडपूर्वी जी स्थिती होती, त्या स्थितीला आता विमानतळ पोचले आहे. मात्र, त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्या नाहीत. पुण्याहून केवळ दुबईसाठी विमानसेवा सुरू आहे. या व्यतिरिक्त कोणतीही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नाही. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योग असणाऱ्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा नसणे ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

पुण्याहून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तीन घटकांतील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. पर्यटन, नोकरी व नातेवाइकांकडे जाण्यासाठी पुणेकर परदेशवारी करतात. मुलामुलीकडे राहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नोकरी करणारा वर्ग हा प्रामुख्याने पुण्यातील हिंजवडी, बाणेर, पाषाण, कोथरूड, बालेवाडी, कोरेगाव पार्क या भागांत राहणारा आहे.

पुण्याहून दुबई, सिंगापूर तसेच फ्रँकफर्टसाठी मोठ्या प्रमाणांत प्रवासी असतात. काही जण थेट येथेच उतरतात तर अनेक जण पुढच्या प्रवासासाठी कनेक्टिंग विमान पकडण्यासाठी या तीन ठिकाणचा प्रवास करतात. अशा प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, मध्य आशिया या ठिकाणी जाण्यासाठी अनेक प्रवासी दुबई, सिंगापूर येथूनच पुढचा प्रवास करतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply