पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! विमानतळावर उतरलेला रुग्ण कोरोनाबाधित, परिसरात खळबळ

कोरोनाने पुन्हा एकदा जगभराची चिंता वाढवली आहे. सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. भारतातही केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला १ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. विमानतळावर या व्यक्तीची कोरोनाचाचणी करण्यात आली. कोरोना तपासणीसाठी नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे ५४ सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये करोना रुग्ण सक्रिय असल्याची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय आहेत तर पुण्यामध्ये ५४ करोना रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रासह भारतासाठी हा चिंतेचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आव्हान केले जात आहे. 

कोरोनाने चीन आणि अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये सध्या कोरोना प्रादुर्भावाने मृत्यूचे तांडव सुरू झाले असून चीनपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना रुग्णसंख्या वाढीनंतर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. दुसरीकडे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी येताना गणेशभक्तांनी मास्क वापरण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply