पीएमपीचा आज बस डे; महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीचा आज बस डे आहे. त्यामुळे आज 5 मार्गांवर लेनद्वारे बस सेवा पुरविण्यात येणार आहे. वाहतूकीसाठी आज 1800 बसेस रस्त्यावर उतरवल्या जाणार आहेत. तसेच महिलांना आज दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. तर आज बस डे निमित्त किमान तिकीट दर हा 5 रुपये असणार आहे. 250 जादा बसेस रस्त्यावर धावणार आहेत. बस डे निमित्ताने पुण्यात आठ दिवस विविध उपक्रमांच आयोजन देखील करण्यात आले आहे. 

उद्या पीएमपीचा वर्धापनदिन आहे. त्यामुळे आज पीएमपीकडून बस डे साजरा करण्यात येतो. बस डेच्या या उपक्रमासाठी वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्याकडून पीएमपीला सहकार्य मिळत आहे. या अनोख्या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पीएमपी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पीएमपी आज एक लकी ड्रॉ काढणार आहे. प्रथम विजेत्याला पीएमपी 1 वर्षाचा पास देणार आहे. तर दुसऱ्या विजेत्याला 6 महिने आणि तिसऱ्या विजेत्याला ज्यात 14 जण असतील, त्यांना तीन महिन्याचा मोफत प्रवास करता येणार आहे. या लकी ड्रॉमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील पीएमपी प्रशासनाने केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply