पिंपरी – हत्यारासह व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे पडले महागात

पिंपरी - हातात तलवार, कोयते घेत व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करणे तिघांना महागात पडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा कोयते व दोन तलवार जप्त केल्या आहेत.

अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे (२१, रा. ओंकारनगर, जाधववाडी, चिखली), ओंकार उर्फ भिकू प्रशांत ठाकूर (१८, रा. माळवाडी, सोळू, खेड), अक्षय देविदास चव्हाण (२३, रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चिखली व आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर भाईगिरी करतानाचे व्हिडीओ गुंडा विरोधी पथकाला मिळाले. पोलिसांनी तातडीने तपास करुन तिघांनाही ताब्यात घेतले. खोजे याच्याकडून दोन कोयते व तलवार तर ठाकूर व चव्हाण यांच्याकडून चार कोयते व एक तलवार जप्त केली. या आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत चिखली व आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply