पिंपरी चिंचवड : विवाहबाह्य संबंध ठेवला अन् उच्च न्यायालयातील वकिल जीवाला मुकला; तिघे अटकेत

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील शिवशंकर दत्तात्रय शिंदे या वकिलाचा अपहरण करून खून केल्या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे. 31 डिसेंबरला ही घटना घडली हाेती. शिंदे हे उच्च न्यायालयात देखील कार्यरत असायचे. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 31 डिसेंबरला काही अज्ञातांनी शिवशंकर शिंदे यांचा खून केला हाेता. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन तिघांना जेरबंद केले आहे. शिवशंकर शिंदे यांचा खून विवाहबाह्य अनैतिक संबंधांच्या संशयावरून करण्यात आल्याचं तपासात उघडकीस आल आहे.

या प्रकरणी राजेश्वर गणपत जाधव, सतीश माणिकराव इंगळे आणि बालाजी मारुती एलनवर या तिघा संशयितांना गुंडाविरोधी पोलिस पथकाने अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार यातील मुख्य संशयित आरोपी राजेश्वर गणपत जाधव आणि त्याची पत्नी स्वाती राजेश्वर जाधव यांचे घटस्फोटाचे प्रकरण शिवशंकर दत्तात्रय शिंदे हे वकील पाहत होते.

शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांच्याकडे जाधव दाम्पत्याच घटस्फोटाचे प्रकरण सुरू असतानाच, स्वाती आणि शिवशंकर यांच्यात विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय राजेश्वर यास आला. त्यातूनच त्यांनी शिवशंकर यांच्या काळेवाडी येथील ऑफिसमधून अपहरण करून तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील चिन्नमा कोरी मंदिराजवळ नेवून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला.

ही सर्व बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या अपहरण आणि खून प्रकरणात तेलंगणा राज्यातील मदनुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशनला वर्ग झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply