पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजा उत्साहात, इंद्रायणी नदी घाटावर शेकडो भाविकांची गर्दी

पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व हे परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरे केले. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा शेकडो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करत व्रत जोपासले. छठची रंगत संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली. सोमवारी छठ पूजेच्या चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला नमस्कार करून महापर्वाची सांगता झाली. उगवत्या सूर्याची आराधना केल्यानंतर, छठ व्रत मोडून ३६ तासांचा निर्जल उपवास सोडला जाईल. मोशी इंद्रायणीमध्ये छठ उत्सवात मोठा उत्साह दिसून आला.

रविवार हा छठपूजेचा हा तिसरा दिवस होता. ३१ ऑक्टोबर रोजी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले गेले. मोशी इंद्रयाणी घाटासह इतर घाटांवर पिंपरी महानगरपालिका कडून अर्घ्याबाबत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भोसरी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. इंद्रायणी नदीघाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. छठ पूजा महापर्वाचे विश्व श्रीराम सेनेचे लालबाबु गुप्ता समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *