पद्म भुषण सन्मान मिळवणारा देवेंद्र झांजरिया ठरला पहिला पॅरा अ‍ॅथलिट

भारताचा दिग्गज पॅरा अ‍ॅथलिट देवेंद्र झांजरियाला भारताचा तसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म भुषण देऊन नावाजण्यात आले. विशेष म्हणजे पद्म भुषण मिळवणारा तो पहिलाच पॅरा अ‍ॅथलिट ठरला. सोमवारी 40 वर्षाच्या देवेंद्र झांजरियाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार देण्यात आला. भालाफेकपटू झांजरियाने अनेक पॅरालंम्पिक स्पर्धेत पदके मिळवली आहे. त्याने 2004 च्या पॅरालंम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच पॅरालंम्पिक होती. त्यानंतर त्याने रिओ पॅरालंम्पिक स्पर्धेत देखील सवर्णकामगिरी केली होती. गेल्यावर्षी पार पडलेल्या टोकियो 2020 पॅरालंम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले. भालाफेकीत F46 प्रकारात खेळणाऱ्या झांजरियाने आतापर्यंत चार पॅरालंम्पिक पदके जिंकली आहे. त्याला गेल्या वर्षी पद्म पुरस्काराने नावाजण्यात आले होते. यंदा त्याला पद्म भुषण पुरस्कार देण्यात आला. यानंतर त्याने 'इतिहासात पहिल्यांदाच पॅरा अ‍ॅथलिटला पद्म भुषण पुरस्कार मिळाला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आता माझी माझ्या देशाप्रती जबाबदारी अधिक वाढली आहे. मला आता भारतासाठी अजून पदके जिंकायची आहेत.' झांजरिया पुढे म्हणाला, 'मी तरूणांना कष्ट करण्याचा सल्ला देईन. एका मिनिटाचे कष्ट तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकत नाहीत. मी गेल्या 20 वर्षापासून कष्ट करतोय. मी 2002 मध्ये माझे पहिले सुवर्ण पदक पटकावले होते.'


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply