पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईश्वराला भेटण्यासाठी काही वेळ अंतर्मुख व्हावेच लागेल

प्रत्येक ठिकाणी जो निनाद घुमत आहे त्या दिव्य शक्तीला, परमात्म्याला स्वतःमध्ये सामावून घेणे म्हणजेच ‘भजन’ होय. भजनात गाणारा आणि ऐकणारा दोघेही त्या ध्वनीचा भाग बनतात. तिथे मनुष्य उरत नाही. जेव्हा असे घडते तेव्हाच भजनाचा खरा आनंद मिळतो. खऱ्या भजनासाठी कोणत्याही वाद्यमेळाची गरज नसते. अनेकांनी कोणत्याही वाद्याशिवाय सुंदर भजने गायली आहेत. त्यांचा आवाज बाहेर ऐकू येतो, पण असे लोक आपल्या अंतर्मनात खूप खोलवर उतरलेले असतात. देवाच्या बाबतीत असे म्हटले जाते की, जो सर्वत्र दिसतो, तो अंतर्चक्षूंनीच पाहिला जाऊ शकतो. आजच्या काळात बाह्य डोळ्यांचे उपयोग इतके वैज्ञानिक झाले आहेत की संपूर्ण जग पाहिले जाऊ शकते, परंतु हे जग बनवणाऱ्याला पाहायचे असेल तर अंतर्मनातच उतरावे लागेल. वर्तमानकाळात भौतिक सुविधेच्या नावाखाली ‘मेटा-चष्म्यांचा’ वापरही खूप वाढला आहे. अशा प्रयोगांमुळे मनुष्य अतिशय बहिर्मुख झाला आहे, पण ईश्वराला भेटण्यासाठी काही वेळ तरी अंतर्मुख व्हावेच लागेल.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *