नाशिक : काही महिन्यांपासून एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आज नाशिकमधील आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एसटी संपामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
शिवनाथ ज्ञानदेव फापाडे, असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. शिवनाथ हे ठाण्यातील शहापूर आगारात गेल्या आठ वर्षांपासून एसटीचे चालक म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी नाशिक येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अपुरे वेतन आणि काही महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. मुलांचा सांभाळ कसा करावा? अशी चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. तसेच त्यांना पगारवाढ देखील दिली आहे. पण, एसटीचे राज्य परिवहन खात्यात विलनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला असून एसटी कर्मचाऱ्यांचं विलनीकरण शक्य नाही, असं या अहवालातून समोर आलं आहे. तरीही कर्मचारी संपावर ठाम आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून राज्य सरकारला अहवालावरील निर्णय देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
संपामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर काही परत कामावर रुजू झाले आहेत. पण, संपाच्या काळातील पगार त्यांना मिळाला नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. आतापर्यंत जवळपास १०० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आशिष शेलार यांनी विधानसभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावात दिली आहे.
शहर
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई! ६३ लाख बोगस शिधापत्रिका (Ration Cards) रद्द होणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा.
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
महाराष्ट्र
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
गुन्हा
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.






















Subscribe to my channel




