अभिनेते अनिल कपूर यांचे नाव बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. ते 1980 च्या दशकापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते आपल्या फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत राहतात. अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये संस्मरणीय भूमिका साकारली आहे. ‘नायक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या डोळसमोर आजही आहे. या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती, परंतु नंतर ते एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते. या चित्रपटातील भूमिकेनंतर त्यांना खऱ्या आयुष्यात राजकारणात येण्याच्या ऑफर आल्या होत्या, मात्र त्यांनी या ऑफर नाकारल्या होत्या. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नायकनंतर मिळाळी राजकारणाची ऑफर
नायक हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह राणी मुखर्जी, अमरीश पुरी आणि परेश रावल या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते. या एका दिवसात त्यांनी अनेक अशी कामे केली होती, ज्यामुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाबाबत इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात अनिल कपूर यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित होताच मला राजकीय पक्षांकडून अप्रत्यक्ष ऑफर आल्या होत्या. राजकारणात जाण्याबाबत चर्चा झाली होती, मात्र मी ती तिथेच थांबवली.’ मात्र अनिल कपूर यांनी ही ऑफर कोणत्या पक्षाकडून मिळाली होती याची माहिती दिली नाही.
ऑफर थेट आल्या नाहीत
अनिल कपूर यांनी सांगितले की, ज्या लोकांना ऑफर दिल्या ते हुशार लोक होते, त्यांनी थेट ऑफर दिली नाही. त्यांनी इतर लोकांमार्फत संदेश पाठवला होता. पुढे बोलताना अनिल कपूर यांनी सांगितले की, ‘मला हे स्पष्ट होते की मी या कामासाठी योग्य नाही. जर मी ते केले तर मी ते खरोखर चांगले करेन. पण माझ्यात ते काम करण्याची क्षमता नाही. खरं तर, मी जे काही स्वीकारतो ते 100% पूर्ण करण्याचे धाडस माझ्यात नाही. मला संयुक्त राष्ट्रांनी अनेक वेळा ब्रँड अॅम्बेसेडर बनण्यास सांगितले आहे. स्लमडॉग मिलेनियरच्या वेळीही ते घडले होते.’
दिखाव्यासाठी राजकारण करायचे नाही
अनिल कपूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, जेव्हा तुम्ही उच्च पदावर असता तेव्हा जगातील प्रत्येक संस्था तुमच्याकडे येते. मी त्यांना सांगितले की, ‘मला ते दिखाव्यासाठी करायचे नाही. चार फोटो प्रसिद्ध होतात आणि नंतर तुम्ही काहीही करत नाही. जर तुम्हाला काही करायचे असेल तर तुम्हाला ते मनापासून, करावे लागेल.’
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


