नाना पाटेकर यांचे 2 लोकप्रिय अभिनेत्रींसोबत अफेअर… तरी बायकोने का नाही दिला घटस्फोट… वेगळे राहतात पण…

Nana Patekar Love Life: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील स्वतःचं नाव मोठं केलं आहे. नाना पाटेकर यांनी ‘गमन’ सिनेमातून करियरची सुरुवात केली. पण ‘परिंदा’ सिमनेमात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेने नाना पाटेकर यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. नाना पाटेकर त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिले. पण त्यांचं खासगी आयुष्या कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलं…

नानांनी नीलू उर्फ ​​नीलकांती पाटेकर या बँकर आणि थिएटर कलाकारासोबत लग्न केलं. नाना पाटेकर आणि नीलू यांची पहिली भेट थिएटरमध्येच झाली होती. तेव्हा नाना महिन्याला 15 नाटकाचे प्रयोग करायचे. प्रत्येक प्रयोगासाठी त्यांना 50 रुपये मिळायचे. म्हणजे महिन्याला नाना पाटेकर यांनी 750 रुपये मिळायचे. तर त्यांच्या पत्नी निलू बँकेत नोकरी करत होत्या आणि त्यांचा पगार 2500 रुपये होता. असं असताना देखील निलू यांनी कोणताच विचार न करता नाना पाटेकर यांच्यासोबत लग्न केलं. असं देखील म्हटलं जातं की, लग्नात त्यांनी फक्त 750 रुपये खर्च केले…

विवाहित नाना यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये आपल्या छाप सोडण्यास सुरुवात केली, तेव्हा नाना एक नाही तर, दोन वेळा प्रेमात पडले. ‘खामोशी द म्यूजिकल’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांचं नातं घट्ट झालं. नाना यांच्यासोबत मनीषा संसार थाटण्याचे स्वप्न पाहत होती. पण नाना पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते. पण जेव्हा नाना आणि मनीषा यांच्या अफेअरबद्दल त्यांच्या पत्नीला कळलं तेव्हा निलू यांनी नाना यांचं घर सोडलं.

मनीषा नाना यांच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहत असताना, नाना यांचं दुसऱ्या अभिनेत्रीसोबत प्रेम प्रकरण सुरु झालं होतं. 2003 मध्ये नाना पाटेकर आणि आयेश झुल्का एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. आयेशा, नाना पाटेकर यांच्यापेक्षा 24 वर्षांनी लहान होती. एक दिवस असा आला जेव्हा मनिषा हिने नाना आणि आयेशा यांना रंगेहात पकडलं… तेव्हाच मनीषा हिने नाना यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

पण नाना पाटेकर आणि आयेशा यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. रिपोर्टनुसार, नाना यांनी शोमध्ये आयेशा हिचा अपमान केलेला… तिच्यावर हात देखील उचलला होता. त्यानंतर आयेशा देखील नाना यांच्यापासून विभक्त झाली. एवढंच नाही तर, नाना आणि त्यांची पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत आहे. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. आता चांगल्या – वाईट वेळी दोघे एकत्र असतात.., असं देखील म्हटलं जातं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *