नवी दिल्ली: ‘असानी’ वादळामुळे 10 उड्डाणे रद्द, आंध्र प्रदेश सहित अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली: 'असानी' चक्रीवादळाने आपले रौद्ररूप दाखवून जनजीवनावर परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, हे वादळ किनारपट्टीजवळ आल्यावर पुन्हा उत्तर-पूर्व दिशेने वळणार आहे आणि त्यानंतर चक्रीवादळाची ताकद कमी होऊ शकते. 'असानी' पूर्व किनार्‍याकडे सरकल्यामुळे बाधित भागात 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळाच्या परिणामामुळे प्रभावित भागात जाणारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. तसेच हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, 'असानी' आज रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यावर ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.

असानी चक्रीवादळामुळे (Cyclone Asani Update) अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चेन्नई विमानतळच्या अथोरोटीज ने सांगितले की, असानी चक्रीवादमुळे चैन्नई विमानतळावर हैद्राबाद, विशाखापट्टणम, जयपूर आणि मुंबई सहित 10 उड्डाणे रद्द केली आहेत. याबाबद कालच प्रवाश्यांना सूचना देण्यात आली होती.

विशाखापट्टणम किनारपट्टीचे दृश्य या व्हिडिओत दिसून येत आहे. तेथे जोरदार वाऱ्यासह समुद्राच्या हालचाली वाढल्या आहेत. विशाखापट्टणममधील सायक्लॉन वॉर्निंग सेंटरचे ड्युटी ऑफिसर कुमार यांनी सांगितले की, असानी हे तीव्र चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य प्रदेशात आणि लगतच्या नैऋत्य भागात कायम आहे. ते विशाखापट्टणमपासून 330 किमी दक्षिण-आग्नेयेस आहे, आज रात्रीपर्यंत ते वायव्य-पश्चिम सरकण्याची शक्यता आहे, ते म्हणाले की, श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम आणि पूर्व गोदावरीसह उत्तर आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 'आसनी'मुळे हैदराबादच्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील 4-5 दिवसांत पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबादच्या हवामान केंद्राचे संचालक नागा रत्न म्हणाले की, तेलंगणात पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. भुवनेश्वरच्या हवामान विभागाने म्हटले आहे की, सध्या 'आसानी' वादळ ओडिशातील पुरीपासून 590 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि गोपालपूरपासून सुमारे 510 किमी दक्षिण-नैऋत्येस आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply