नवाब मलिकांना मोठा धक्का; ED कडून ८ मालमत्ता जप्त

मुंबई : मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं (ED) मोठी कारवाई केली आहे. मलिक यांच्या मुंबईसह इतर भागांतील विविध आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

दाऊद इब्राहीमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीनं आता त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील कुर्ला येथील जमिनीसह राज्यातील इतर भागांतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील व्यावसायिक मालमत्ता, उस्मानाबादमधील १४७ एकर जमीन देखील ईडीनं जप्त केली आहे. जवळपास पावणेदोन महिन्यांपासून मलिक हे या प्रकरणात अटकेत आहेत.

गोवावाला कंपाऊंड, कुर्ला (पश्चिम)

एक व्यावसायिक युनिट, कुर्ला (पश्चिम).

उस्मानाबाद जिल्ह्यातील 59.81 हेक्टर शेतजमीन

कुर्ला पश्चिम इथले तीन फ्लॅट

वांद्रे पश्चिम इथले दोन फ्लॅटचा समावेश आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *