ढग दाटले! मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पावसाचा इशारा

एकीकडे राज्यातील तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असून दुसरीकडे, बऱ्याच ठिकाणी उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून विदर्भात मात्र पारा वाढतच जात आहे. यातच रविवारपासून (ता. १०) पश्‍चिम विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस पडला. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे ४३.६ अंश सेल्सिअस इतकी झाली.

राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली असून काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर कायम आहे. त्यातच किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाडा अधिक जाणवू लागला आहे. दरम्‍यान ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार आहे. विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

सध्या मराठवाड्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले असून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. १०) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

येथे कमाल तापमान जास्त

मालेगाव ः ४२.६

चंद्रपूर ः ४२

वर्धा ः ४२.२

अकोला ः ४३.६

वाशीम ः ४३

अमरावती ः ४३

मध्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून विदर्भात मात्र पारा वाढतच जात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply