ठाकरे गटाला धक्का; शर्मिला येवलेसह युवती सेनेच्या ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारबरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने, राज्यात नव्याने सरकार स्थापन केले. या घटनेला जवळपास चार महिन्याचा कालावधी होत आला आहे. या कालावधीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळील अनेक शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.त्याच दरम्यान आज पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ युवती पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारणामुळे आम्ही राजीनामा देत असल्याच पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. मात्र, आम्ही पक्षाचे कार्यकर्ती म्हणून काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी युवती सेनेकडून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या राजीनाम्याबाबत शर्मिला येवले म्हणाल्या की, मागील दोन वर्षांपासून शिवसेनेच्या युवती राज्यभरात अनेक आंदोलन, निवडणुकांमध्ये काम करीत आहे.मात्र प्रत्येक वेळी युवती सेने मधील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक दिली गेली नाही.आंदोलन घेतले तर प्रसार माध्यमांशी का प्रतिक्रिया दिली.प्रसार माध्यमांशी संवाद साधू नका अस अनेक वेळा सांगण्यात आले. आपला पक्ष,आपली काम याच माध्यमा मधुन नागरिकां पर्यन्त पोहोचू शकतो.हे बाब वरीष्ठना सांगून देखील सतत आम्हाला कोणतीही भूमिका मांडू दिली गेली.त्यामुळे आम्ही अखेर सर्व ३६ युवती पदाधिकारी राजीनामे देत आहोत. मात्र, आम्ही कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार आहे. आम्ही कोणत्याही इतर पक्षात जाणार नाही. या सर्व घडामोडी घडत असताना आमच्या कामाच आदित्य ठाकरेआणि वरुण सरदेसाई यांनी कौतुक देखील केले. पण पक्षातील वरीष्ठ मंडळीकडून चूकीची वागणूक देत असल्याने आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply