
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई : जिल्हा परिषदांतील १३ हजार ५२१ रिक्त पदांची २०१९मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया २०२२मध्येही रखडलेलीच आहे. तीन वर्षांपूर्वी याकरीता घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २० लाख उमेदवारांनी पाच ते सात हजार रुपये अर्जापोटी भरले. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील उमेदवार परीक्षा होण्याची वाट पाहत आहेत. असे असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भरती प्रक्रियाच रद्द केली असल्याबाबतची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांतून फिरू लागल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांना केवळ सत्ता दिसते, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते, पण नोकरीसाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार दिसत नाहीत का, जिल्हा परिषद भरती सातत्याने का पुढे ढकलली जाते, असा संताप उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.
सामान्य प्रशासन विभागाने २६ ऑगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे कालबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात खासगी कंपनीची निवड करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आणि निकाल, नियुक्ती प्रक्रिया राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. या वेळापत्रकामुळे परीक्षा होण्याची आशा उमेदवारांमध्ये निर्माण झाली. मात्र काही दिवसांपूर्वी त्या वेळापत्रकालाही स्थगिती देण्यात आली. आता भरती प्रक्रिया कधी होणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. कधी अर्जदारांची माहिती गोळा करणे, कधी अन्य परीक्षांचे कारण देत आतापर्यंत तीन वेळा ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यातच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि स्पर्धा परीक्षार्थी यांच्यातील जिल्हा परिषद भरतीबाबतच्या दूरध्वनी संवादाची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांत फिरू लागल्याने उमेदवार अधिकच संतप्त झाले आहेत.
तुकाराम नाटकर या उमेदवाराने वेगवेगळय़ा जिल्हा परिषदांमध्ये चार-पाच पदांसाठी २०१९ मध्ये अर्ज केला. त्यासाठी पाच-सात हजार रुपये परीक्षा शुल्क भरले. माझे आई-वडील कोरडवाहू शेतकरी आहेत. आता त्यांना शेतीचे कामही झेपत नाही. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. नोकरी मिळण्यासाठी जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला, पण तीन वर्षांत परीक्षाच झालेली नाही. राज्यातील सरकारे बदलली, पण परीक्षेचा पत्ताच नाही. वय वाढत चालले आहे. माझ्यासारखे लाखो उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषद भरती परीक्षा व्हायला हवी. परीक्षा होत नसल्याने आता नैराश्याची भावना वाढत आहे. माझ्यासारख्या उमेदवारांनी करायचे काय, असा उद्विग्न प्रश्न तुकारामने विचारला.
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला, तेव्हा माझे वय २४ वर्षे होते, आता मी २८ वर्षांचा आहे. वय वाढते आहे, पण परीक्षा काही होत नाही. या भरती प्रक्रियेत तीन पदांसाठी अर्ज केला होता. या अर्जासाठी भरलेले अडीच हजार रुपये अडकले आहेत. परीक्षा होईल या आशेवर आजपर्यंत वाट पाहिली. साडेतीन वर्षांत परीक्षेबाबत मार्ग निघाला नाही. माझे आईवडील शेतकरी आहेत. मी अजूनही बेरोजगार आहे. पण परीक्षेची वाट पाहण्याशिवाय पर्यायही नाही, असे अजय खोजे या उमेदवाराने सांगितले.
जिल्हा परिषद भरतीमध्ये पाच पदांसाठी अर्ज भरला होता. त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क भरले. आतापर्यंत तीन वेळा भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. परीक्षा होईल या आशेने तयारी करत आहोत. परीक्षा का होत नाही याचे उत्तरही मिळत नाही. आई वडील शेती करतात. परीक्षा कधी होईल याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. काय करावे हे कळत नाही. मंत्री-प्रशासनाशी संपर्क साधला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे एका उमेदवाराने सांगितले.
‘गेली तीन-साडेतीन वर्षे अभ्यास करत आहोत. आज परीक्षा होईल, उद्या परीक्षा होईल, अशी आश्वासने मिळतात. होत काहीच नाही. २०१९ मध्ये १३ हजार ५१२ विविध पदांसाठी २० लाखांहून अधिक मुलांनी अर्ज भरले. पण सरकारला परीक्षा काही घेता आली नाही. परिणामी मान खाली घालून अभ्यास करण्यापलीकडे आमच्या हाती काही राहिले नाही’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया राधाकिशन बडे या विद्यार्थ्यांने दिली.
राजीनाम्याची मागणी
कथित ध्वनिफितीतील अर्वाच्य भाषेविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विटरद्वारे हल्ला चढवत महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले, की २०१९मध्ये सुरू केलेल्या भरती प्रक्रियेतील परीक्षा २०२२मध्येही होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत. गिरीश महाजनांचे बेरोजगारांसोबतच्या अशोभनीय वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांना मंत्री पदावर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
नेमके झाले काय?
लाखो उमेदवारांनी परीक्षा अर्ज आणि शुल्क भरले. २०१९ ते २०२२ या कालावधीत राज्यात दोन वेळा सत्तांतर झाले, पण परीक्षा झाली नाही. अर्जाच्या चलनापोटी महापोर्टलवर २५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर पसरल्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
कथित ध्वनिफितीत काय? एक विद्यार्थी दूरध्वनी करून ‘झेडपीची फाइल तुमच्याकडे आली असून, ती पाठवा ना साहेब. मुले खूप तणावग्रस्त परिस्थितीत आहेत.’ त्यावर समोरील व्यक्ती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन असल्याचा आरोप केला जात आहे. ते म्हणतात, ‘तुम्हाला काही कामे नाहीत का रे? दिवसभरातून पाचशे फोन लावता, मी काही करत नाही, ती रद्द झाली.’ त्यावर विद्यार्थी म्हणतो, ‘अहो साहेब, मुले डिप्रेशनमध्ये आहेत.’ त्यावर पुन्हा समोरून ‘रद्द केली ती भरती. ठेव फोन’ असे सांगितले जाते.
उमेदवारांचे म्हणणे..
- जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत उमेदवारांनी वेगवेगळय़ा पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यासाठी दोन-अडीच हजार रुपयांपासून सात-आठ हजार रुपयांपर्यंत शुल्क भरले आहे.
- परीक्षा होत नसल्याने उमेदवारांसे पैसेही अडकले आहेत. आम्ही परीक्षा अर्जासाठी भरलेले पैसे सरकारने वापरले, पण आमच्या परीक्षांचे काय.
- गरीब गरजू उमेदवारांची सहनशीलता आता संपली आहे, अशा शब्दांत उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


