जळगाव : देव्हाऱ्यातील दिव्याने झाली संसाराची राख; रोख रक्‍कमेसह संसारोपयोगी वस्‍तू जळाल्‍या

जळगाव : परिवार सकाळी उठला. सर्वांची तयारी झाल्‍यानंतर देवासमोर नित्‍यनियमानुसार दिवा लावला. परंतु, देव्हाऱ्यातील दिव्यामुळे घराला आग लागून होत्याचे नव्हते झाले. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्‍या या घटनेत दोन घरांना आग लागली अन्‌ घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. 

जळगावातील जुने जळगाव या परिसरातील आंबेडकरनगरातील हिरालाल बाबुलाल बाविस्कर (वय ६२) आणि त्यांच्या शेजारी शरद सपकाळे यांच्या घराला आज सकाळी देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागली. घराच्या बाजूच्‍या रहिवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्र रूप घेतले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यात यश आले. मात्र यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

१८ हजाराची रोकड जळाली

आगीमुळे शेजारी असलेले पार्टिशनच्या घराने देखील पेट घेतला. दरम्यान, हिरालाल बाविस्कर यांचा अंकुश मुलगा कंपनीत कामाला जातो. अंकुशने दोन दिवसांपूर्वीच कामाचे पैसे घरी आणले होते. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे आणि १८ हजाराची रोकड जळून खाक झाली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *