चिपळूण : जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चिपळूण : खेड तालुक्यात रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने जगबुडी नदी धोकादायक पातळीवरून वाहत असल्याने खळबळ उडाली आहे. खेड शहरात अद्याप पाणी आलेले नाही. मात्र जगबुडी नदी काठच्या सुमारे पंचवीस ते तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये अलसुरे निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे. वेरळ व सुकीवली येथील वाड्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठ दिवसात जगबुडी नदीने अनेकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज सकाळपासून जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून म्हणजेच ७.२० मीटर यावरून वाहत आहे. ७ मीटर ही जगबुडी नदीची धोकादायक पातळी आहे. दापोली खेड मार्गावरही पाणी आले नसले तरी पावसाचा जोर कायम राहिला तर हा मार्ग कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो. मुंबई – गोवा महामार्गावरील नवीन पुल मात्र वाहतूकीसाठी खुला आहे. तिथपर्यंत पाणी पोहचलेले नाही.

खेड पालिका हद्दीत नदीकाठी झोपडपट्टी आहे. तेथील ३७ कुटुंबांना गेल्या आठवड्यात सुरक्षित स्थळी हलवले आहे. मुकदाम हायस्कूल, एलपी स्कुल आदी ठिकाणी या कुटुंबाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकचे १८ जवान खेड येथे दाखल झाले आहे. खेड शहरात मटण मार्केटजवळ पाणी कायम आहे. शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर सह्याद्री खोऱ्यात सुरू असलेला पाऊस यामुळेही या नदीची पाणी पातळी वाढली आहे. नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply