चंद्रपूर : अनैतिक संबंधाचा संशय; पत्नीच्या कथित प्रियकरावर भरचौकात चाकू हल्ला

चंद्रपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कथीत प्रियकरावर पतीने चाकू हल्ला केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर इथे घडली. यात कथित प्रियकर दिनेश महादेव काळे (वय ३६) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

गडचांदूर शहरातील मुख्य मार्गावर हा हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या आरोपी पतीचे नाव भास्कर असे आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर भास्कर याने दिनेशला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण दिनेश त्याच्या तावडीतून कसाबसा सुटला. या झटापटीत तो जखमी झाला.

Follow us -

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी भास्कर यास ताब्यात घेतले. भास्करचे पत्नीशी पटत नसल्याने ती जवळच्याच बीबी या गावात दिनेश काळे याच्या घरी राहायची. या दोघांच्यात अनैतिक संबंध असल्याची शंका भास्करला आल्याने त्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply