गोव्यात शिवसृष्टी उभारणार – डॉ. प्रमोद सावंत

   

पुणे - गोव्यात छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील कर्तृत्वावर आधारित शिवसृष्टी निर्माण करण्यात येईल. तसेच, गोवा येथील किल्ल्यांचे संवर्धन ‘पीपीपी’ तत्त्वावर करण्यात येईल, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाला दिले.

मराठा सेवा संघाच्या वतीने शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पणजी येथे भेट घेतली. जिजाऊंचे तैलचित्र, शिंदेशाही पगडी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप-वाघनखे व कवड्यांची माळ असे स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्री सावंत यांचा सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वतीने शिष्टमंडळातील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर, पुणे शहराध्यक्ष सचिन आडेकर, संभाजी ऊर्फ आबा जगताप यांनी सावंत यांना निवेदन दिले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यावेळी गोव्याशी आलेला संबंध, पोर्तुगिजांविरूध्द लढाई तसेच ऐतिहासिक माहिती देशातील आणि जगातील पर्यटकांना व्हावी, यासाठी गोव्यात शिवसृष्टी उभारण्यात यावी. राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा गोवा मंत्रालयात लावण्यात यावी, महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात सारथी संस्था सुरू करण्यात यावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता. त्यावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील कर्तृत्वावर आधारित शिवसृष्टी गोवा येथे निर्माण करण्यात येईल. तसेच, गोवा येथील किल्ल्यांचे संवर्धन ‘पीपीपी’ तत्त्वावर करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply