
कराड : पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून संतापलेल्या निर्दयी इसमाने आपल्या पोटच्या पाच व सहा वर्षे वयाच्या दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कराडलगतच्या गोटे गावामध्ये घडली.पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. तर श्लोक रामदास वायदंडे (वय ५) व शिवम रामदास वायदंडे (वय ६) अशी जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. यापैकी श्लोक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामदास वायदंडे हा आपली आई इंदूबाई, पत्नी मयुरी तसेच शिवम, श्लोक व ३ वर्षांची मुलगी बेला यांच्यासह गोटे गावी राहत आहे. दरम्यान, रामदास व मयुरी यांना एक महिन्यापूर्वी तिसरा मुलगा झाला. त्यानंतर मयुरीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यास रामदासचा विरोध होता. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होता. याच रागातून रामदास हा मयुरीने शस्त्रक्रिया केलेले टाके कोयत्याने तोडण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून इंदुबाईंनी मयुरीला तिच्या माहेरी पाठविले होते.
रामदास हा रविवारी (दि.१८) सायंकाळी मयुरीने कुटुंब नियोजनाची शास्त्रक्रिया का केली? व तिला माहेरी का पाठवले? म्हणून घरांमध्ये भांडण करीत होता. मुलांना मारहाण करीत होता. तसेच आई इंदुबाईसह आज कोणालाच सोडणार नाही, असे धमकावत होता. यावर इंदुबाई या शिवम व श्लोकला घेऊन घराबाहेर बसल्या होत्या. परंतु, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुले खेळत घरामध्ये गेली. त्यांच्या पाठीमागून इंदुबाईही घरामध्ये धावल्या. तेव्हा रामदासने शिवीगाळ करत आता तुम्हाला ठार मारून टाकतो, असे म्हणत शिवम व श्लोकवर कोयत्याने वार केले. यामध्ये श्लोकच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तसेच शिवमच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार झाल्याने तोही जखमी झाला. यावेळी इंदुबाईनी आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जमा झाले. त्यांनी रामदासकडील कोयता हिसकावून घेत जखमी श्लोक व शुभमला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेची खबर मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी रामदास वायदंडेला अटक केली. याबाबतची फिर्याद दिलीप गुलाब तुपे (रा. मुंढे) यांनी पोलिसांत दिली आहे.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


