औरंगाबाद शहर कोरोना मुक्तीकडे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर काही दिवसांपासून रुग्णांची संख्या रोडावली आहे. आजघडीला शहरात केवळ दोन पॉझिटिव्ह रुग्ण असून, ते घरीच उपचार घेत आहेत. त्यातील एकाचे सात दिवस सोमवारी तर दुसऱ्याचे सात दिवस बुधवारी संपणार आहेत. याकाळात नवा रुग्ण आढळून आला नाही तर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शून्य होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरात हजारो रुग्ण बाधित झाले. त्यामुळे महापालिकेला प्रशासनाची उपाय-योजना करताना तारांबळ उडाली. तिसऱ्या लाट मात्र अवघ्या महिनाभरात ओसरली. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. सध्या दोनच पॉझिटिव्ह रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. पुढील पाच दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही तर शहर कोरोना रुग्ण मुक्त होणार आहे. खासगी लॅबचे अहवाल पॉझिटिव्ह.

महापालिकेच्या अहवालानुसार गुरुवारी फक्त दोन जणांच्या चाचण्या झाल्या. काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढे आहे. महापालिकेतर्फे घेतलेल्या स्वॅब कलेक्शनमधून सध्या एकही अहवाल पॉझिटिव्ह येत नाही. पण खासगी लॅबमार्फत घेतलेल्या अहवालातून एखादा रुग्ण पॉझिटिव्ह निघत असल्याचे सूत्रांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply