ऑस्कर विजेते संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेवरून मांडलेल्या मतामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर आपापली मतं मांडली आणि त्यापैकी काहींनी रेहमान यांना चुकीचंही ठरवलं. इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या आठ वर्षांत मला काम मिळालं नाही, असं रेहमान यांनी म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका अनुराधा पौडवाल यांनी रेहमान यांच्या वक्तव्यावर आपलं मत मांडलं आहे. “ए. आर. रेहमान यांना मी त्यांच्या संगीतातूनच ओळखते. मी कधीच त्यांना वैयक्तिकरित्या भेटले नाही. पण त्यांचं संगीत सांगतं की ते अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत”, असं अनुराधा म्हणाल्या.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “मी या इंडस्ट्रीचीच आहे आणि मी अनेकदा पाहिलंय की जेव्हा एखादा कलाकार, मग ते ए. आर. रेहमानच नाही तर कोणताही कलाकार मुलाखतीसाठी बसतो, तेव्हा मुलाखत घेणारे सहसा अशाप्रकारे प्रश्न तयार करून विचारतात, जेणेकरून त्यांना अपेक्षित असं उत्तर मिळेल. मीडिया, चॅनल्स यांना थेट किंवा सरळ मुलाखती आवडत नाहीत. कारण त्यांना दुसरं काहीतरी हवं आहे. रेहमान यांनी या संगीत विश्वात भरभरून योगदान दिलं आहे, त्यामुळे यांसारख्या वादापेक्षा ते मोठे आहेत.”
“ए. आर. रेहमान यांनी आपल्याला खूप मोठे आकडे दिले आहेत आणि या सर्व वादांच्या पलीकडचे ते आहेत. त्यांनी खूप काही मिळवलंय. त्यामुळे ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे कोणीही येऊन त्यांच्या करिअरला प्रभावित करू शकतील. एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मला हेच वाटतं. त्यांनी गाण्यांमधून खूप कमाल काम केलंय, त्यामुळे या वादाला काहीच अर्थ नाही”, असं मत अनुराधा पौडवाल यांनी मांडलंय.
याआधी ‘IANS’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले होते, “जातीय मुद्दे हे गेल्या बऱ्याच काळापासून समाजात चर्चेत आहेत आणि जे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करतात त्यांना अशा वादविवादांनी काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे मी हेसुद्धा सांगू इच्छितो की एखाद्याच्या एकाच विधानाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करून तो एक मोठा मुद्दा बनवू नका. जे लोक त्यांचं काम जाणतात, ते याने प्रभावित होत नाहीत. ते त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रीत करतात. ज्यांना राजकारण करायचं आहे ते तेच करतात.”
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


