इंधन दरवाढीमुळे वाहने चालवावीत की पार्किंगमधे उभी ठेवावीत, सामान्य नागरीकांना प्रश्न

नवी मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून यापाठोपाठ सीएनजीचे दरही आता वधारले आहेत. इंधन दरवाढीचा मोठा फटका सामान्य नागरीकांना बसत असून आता वाहने चालवावीत की पार्किंगमधे उभी ठेवावीत हा प्रश्न नागरिकांना पडलाय.

मागील महिनाभर इंधनाचे दर स्थिर असलेले पहायला मिळत होते. मात्र, 5 राज्यातील निवडणुका होताच इंधनाचे दर रोज वाढताना पहायला मिळत आहेत. मुंबईत पेट्रोल  120 रुपयांच्या वर पोहोचलंय, तर डिझेल 104 रुपयांच्या वर पोहोचलंय. पेट्रोल-डिझेल महाग म्हणून नागरीक सीएनजी वाहने खरेदी करतात. मात्र, सीएनजीचे दरही मागील काही दिवसात तब्बल 7 रुपयांनी वाढल्याने सामान्य नागरीक मेटाकुटीला आलाय. अशा परिस्थितीत वाहने चालवावीत की पार्किंगमधे उभी ठेवावीत या द्विधा मनस्थितीत नागरीक आहेत.
या तीनही प्रकारच्या इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांकडे (Electric Vehicle) पाहिलं जातं. मात्र, अपुरे चार्जिंग स्टेशन आणि इतर वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांच्या किमतींमध्ये मोठा फरक असल्याने इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीला नागरीकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट त्यात वाढलेली प्रचंड महागाई याने नागरीक त्रस्त झाले असून आपली वाहने पार्किंगमधे ठेऊन सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग नागरीक स्वीकारत आहेत.
एकूणच रोज होणारी इंधनाची दरवाढ पाहून सामान्य नागरीकांचे मासिक बजेट अडचणीत आले असून आपली खाजगी वाहने पार्किंगमध्ये ठेऊन सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे सध्या नागरीक पसंत करत आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply