अहमदाबाद : तटरक्षक दलाची अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटवर कारवाई, शस्त्रास्त्रांसह 300 कोटींचे ड्रग्स जप्त

अहमदाबाद : नववर्षाच्या काही दिवस आधी अरबी समुद्रात तटरक्षक दलाने साहसी कारवाई केली आहे. तटरक्षक दलाने शस्त्र आणि ड्रग्सचा मोठा साठा असलेल्या बोटवर कारवाई केली आहे. जवळपास 300 कोटींचे ड्रक्स या कारवाईत जप्त करण्यात आले आहे.

गुजरात एटीएसच्या गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना भारतीय तटरक्षक दलाने सांगितले की, ATS गुजरातने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रातील भारतीय क्षेत्रात एक पाकिस्तानी बोट अडवण्यात आली. या बोटीमध्ये 10 क्रू मेंबर्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि 40 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. 

विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे 25-26 डिसेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आल्याचे फोर्स अधिकाऱ्यांनी सांगितले. रणनीतीच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलाने त्यांचे जहाज ICGS अरिंजय पाकिस्तानबरोबर आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ तैनात केले होते.

दरम्यान, पथकाने अल सोहेली या पाकिस्तानी मासेमारी नौकेला चौकशी आणि तपासणीसाठी अडवले. बोटीची झडती घेतली असता त्यामधून मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि सुमारे 40 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या औषधाची किंमत अंदाजे 300 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नौकेसह कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी चालक दल आणि बोट ओखा येथे आणण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply