‘अदृश्य’ या मराठी सिनेमाशी काय आहे टायगर श्रॉफचं कनेक्शन?

अदृश्य(Adrushya) चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल हे बॉलिवुड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आहेत . विशेष बाब म्हणजे 'अदृश्य ' सह त्यांनी तीन अन्य भाषां मध्ये अन्य कलाकारांना घेऊन सिनेमे बनवले आहेत. एकाच वेळी ४ भाषां मध्ये सिनेमा शूट होणे हे पहिल्यांदाच घडत आहे .बॉलिवूड चे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी सिनेमांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा 'अदृश्य' १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

अदृश्य' सिनेमात पुष्कर जोग , मंजिरी फडणीस ,अनंत जोग , उषा नाडकर्णी ,अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत .'अदृश्य' हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा असून अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे . सिनेमाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत.

बॉलिवुड चा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफला देखील या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यांनी आपल्या शुभेच्छा कबीर लाल व सिनेमाच्या टीम ला दिल्या आहेत . हा सिनेमा चार भाषेत एकाच वेळेस बनवला गेला आहे याचं त्यानं कौतूक केलं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक कबीर लाल हे त्याच्या फेव्हरेट सिनेमॅटोग्राफरपैकी एक आहेत. त्यांचं काम त्यानं पाहिलंय. त्यामुळे दिग्दर्शनातील कबीर लाल यांच्या पदार्पणासाठी तो उत्सुक आहे असंही त्यानं म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply