मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ 4 कोटी रुपयांची रोकड पकडली

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चार कोटी रुपयांची रोकड पकडली आहे सोमवारी (दि. 28) रोजी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

 ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 आर्च रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अवैधरीत्य पैशाची वाहतूक होणार आहे. त्या बातमीची शहानिशा व खातर जमा करण्यासाठी पोलीस स्टेशन लोणावळा ग्रामीणचे एक पथक नेमण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एक संशयित कार मुंबईकडून पुण्याकडे जाताना मिळून आली.

 त्यावेळी पोलीस पथकाने कौशल्याने तिला ताब्यात घेण्यात आले सदर कार (KA 53 MB 8508) क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार चेक करण्यात आली. तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात चेक केले असता 4 करोड रुपयाची रोख रक्कम चालक नामे महेश नाना माने (रा. विठा जि. सांगली) व विकास भाजी घाडगे (रा. शेटफळ जि. सांगली) यांच्या ताब्यात मिळून आली आहे.

सदर रक्कमेबाबत विचारपूस करता त्या संबंधी कागदपत्रे अथवा पुरावे व वाहतूक परवाना व त्याबाबतचे कारण त्यांना सांगता आले नाही. पोलीस निरीक्षक मोरे म्हणाले, सदरच्या रक्कमेबाबत माहिती घेण्याचे काम चालू असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम कोठून व कशासाठी आणली तसेच लपून

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहा फौजदार ताराम बोकड, युवराज बनसोडे, पोलीस हवालदार अमित ठोसर, महिला पोलीस पुष्पा घुगे, पोलीस नाईक गणेश होळकर, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply